Gudi Padwa 2024: मराठी मालिकांमध्ये उत्साहात साजरा होणार गुढीपाडव्याचा सण, पाहा Photos

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

‘गुढीपाडवा’

'चैत्र शुद्ध प्रतिपदा' म्हणजेच ‘गुढीपाडवा’ उत्साहाने आणि उमेदीने साजरे करण्याची आपली परंपरा आहे.

Gudi Padwa 2024 Celebrate The Marathi Serial | Saam Tv

मालिकेंमध्येही गुढीपाडव्याची लगबग

मराठी मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही. सध्या मालिकेंमध्येही गुढीपाडव्याची आपल्याला लगबग पाहायला मिळत आहे.

Gudi Padwa 2024 Celebrate The Marathi Serial | Saam Tv

पारंपरिक पद्धतीने साजरा होणार गुढीपाडवा

'ठरलं तर मग', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'अबोली', 'घरोघरी मातीच्या चुली', 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' आणि 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे.

Gudi Padwa 2024 Celebrate The Marathi Serial | Saam Tv

'लक्ष्मीच्या पाऊल'

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मधील अद्वैत-कलाचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्याने दोन्ही जोड्यांसाठी यंदाचा गुढीपाडवा खास असणार आहे.

Gudi Padwa 2024 Celebrate The Marathi Serial | Saam Tv

'घरोघरी मातीच्या चुली'

'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये १५ वर्षांनंतर रणदिवे आणि विखे-पाटील कुटुंब एकत्र गुढी उभारणार आहेत. सौमित्र आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर सयाजीरावांनी एकत्र गुढी उभारण्यास सहमती दिली आहे.

Gudi Padwa 2024 Celebrate The Marathi Serial | Saam Tv

'सुख म्हणजे नक्की काय असतं'

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी शालिनी आणि नित्या पहिल्यांदा एकमेकींसमोर येणार आहेत. त्यामुळे ह्या गुढीपाडव्याला शालिनीसाठी नवा धमाका असणार आहे.

Gudi Padwa 2024 Celebrate The Marathi Serial | Saam Tv

'ठरलं तर मग'

'ठरलं तर मग' मालिकेतही कलाकारांनी जल्लोषात गुढी उभारली आहे.

Gudi Padwa 2024 Celebrate The Marathi Serial | Saam Tv

'अबोली'

'अबोली' मालिकेतही कलाकारांनी जल्लोषात गुढी उभारली आहे.

Gudi Padwa 2024 Celebrate The Marathi Serial | Saam Tv

NEXT: अल्लू अर्जून जगतो रॉयल लाईफ, आहे गडगंज संपत्तीचा मालक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Allu Arjun Net Worth | Instagram/ @alluarjunonline