Surabhi Jayashree Jagdish
बडीशेपचं पाणी तयार करण्यासाठी बडीशेप रात्रभर पाण्यात भिजत ठेवली जाते आणि सकाळी ते पाणी गाळून प्यायलं जातं. बडीशेप उकळून त्याचे पाणी गाळून घेण्याचाही पर्याय आहे. बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि आवश्यक नैसर्गिक तेलांचे प्रमाण असते.
मेथीचे पाणी बनवण्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले जातात. सकाळी हे पाणी गाळून घेतलं जातं आणि त्याचे सेवन केलं जातं. मेथीमध्ये फायबर, प्रोटीन आणि लोह यांसारखे पोषक घटक असतात.
वारंवार गॅस, अॅसिडिटी किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर बडीशेपचं पाणी अधिक योग्य मानलं जातं. बडीशेपचं पाणी प्यायल्याने पोटाला थंडावा मिळण्यास मदत होते. त्यामुळे जेवणानंतर बडीशेपचं पाणी घेणं पचनासाठी फायदेशीर ठरू शकतं.
बद्धकोष्ठतेचा त्रास किंवा पचनक्रिया मंदावल्याची समस्या असेल तर मेथीचं पाणी अधिक फायदेशीर ठरू शकतं. मेथीमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अशा प्रकारच्या पचनाच्या समस्यांसाठी मेथीचं पाणी आहारात समाविष्ट केलं जाऊ शकतं.
शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढण्याच्या दृष्टीने बडीशेप आणि मेथीचं पाणी दोन्ही उपयुक्त मानले जातात. बडीशेपचं पाणी शरीरातील टॉक्सिक घटक बाहेर काढण्यास मदत करते. तर मेथीचं पाणी यकृत निरोगी ठेवून शरीराची अंतर्गत स्वच्छता राखण्यास हातभार लावते.
वजन कमी करण्याच्या दृष्टीने बडीशेपच्या तुलनेत मेथीचं पाणी अधिक फायदेशीर ठरू शकतं. मेथीमधील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहण्यास मदत होते. त्यामुळे भूक वारंवार लागण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
सकाळी रिकाम्या पोटी मेथीचं पाणी घेतल्याने वजन कमी करण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. तर जेवणानंतर बडीशेपचे पाणी घेतल्यास पचनासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.