Face Care: ओपन पोर्स कमी करुन त्वचेला कूलिंग देण्यासाठी वापरा घरी तयार केलेला हा स्पेशल वॉटर स्प्रे

Shruti Vilas Kadam

घरच्या घरी तयार करा मिस्ट

अर्धा कप तांदूळ स्वच्छ धुवून त्यात १ कप पाणी घालून ३० मिनिटे भिजत ठेवा. ते पाणी गाळून त्यात ३–४ चमचे रोझ वॉटर मिसळा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.

Face Care | Saam Tv

त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो

राईस वॉटरमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचेला पोषण देतात, तर रोझ वॉटर त्वचेला फ्रेश आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.

Face Care | Saam tv

ओपन पोर्स कमी करण्यास मदत

रोझ वॉटर नैसर्गिक टोनरप्रमाणे काम करते. नियमित वापरामुळे त्वचेवरील मोठे पोर्स कमी दिसू शकतात.

Face Care | Saam Tv

त्वचा थंड आणि हायड्रेटेड राहते

उन्हाळ्यात किंवा मेकअपपूर्वी हा स्प्रे वापरल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि स्किन हायड्रेट राहते.

Face Care | Saam Tv

पिंपल्स आणि रेडनेस कमी होण्यास मदत

राईस वॉटरमधील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म त्वचेची जळजळ आणि पिंपल्समुळे होणारा लालसरपणा कमी करू शकतात.

Face Care | Saam Tv

मेकअप सेटिंग स्प्रेप्रमाणेही उपयोग

हलका आणि नैसर्गिक असल्यामुळे हा स्प्रे मेकअप आधी किंवा नंतर वापरता येतो. त्यामुळे मेकअप फ्रेश दिसतो.

Face Care | Saam Tv

वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

हा स्प्रे ४–५ दिवसांच्या आत वापरणे उत्तम. संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करून मगच चेहऱ्यावर वापरा.

Face Care | Saam Tv

Weight Loss: जाड मांड्या आणि हिप्सवरील चरबी कमी करायची आहे? आहारात समाविष्ट करा हे 7 पदार्थ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss | pinterest
येथे क्लिक करा