Saam Tv
भारतीय पदार्थांमध्ये कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग केला जातो. कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
कढीपत्त्यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी गुणधर्म आढळतात ज्यामुळे आरोग्याला फायदे होतात.
कढीपत्त्यामध्ये फायबर आढळते त्यामुळे रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने पचन यंत्रणा सुधारते.
सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहाण्यास मदत होते.
कढीपत्त्यामध्ये फायबर आढळतं ज्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स आढळतात ज्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
कढीपत्ता खाल्ल्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते त्यासोबतच पिंपल्स आणि मुरुम यासारख्या समस्या दूर होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.