Liver cancer early signs: लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यास शरीरात कोणती लक्षणं दिसतात?

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हरमध्ये गाठ

लिव्हरमध्ये गाठ असल्यास सुरुवातीला फार स्पष्ट लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेकदा हा आजार उशिरा लक्षात येतो. मात्र शरीर काही सूक्ष्म संकेत देत असतं, जे वेळेत ओळखणं खूप महत्त्वाचं ठरतं.

liver tumor symptoms

पोटाच्या उजव्या बाजूला वेदना

लिव्हरमध्ये गाठ असल्यास पोटाच्या उजव्या वरच्या भागात सतत वेदना किंवा जडपणा जाणवू शकतात. ही वेदना कधी सौम्य तर कधी तीव्र स्वरूपात असते आणि खांद्यापर्यंतही पसरू शकते.

liver cancer early signs

भूक कमी होणं

या स्थितीत व्यक्तीची भूक हळूहळू कमी होत जाते. जेवणाची इच्छा नसणं आणि थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणं अशी लक्षणे दिसतात. कोणतेही प्रयत्न न करता वजन कमी होऊ लागते.

signs of liver disease

थकवा

लिव्हरमध्ये गाठ असल्यास शरीरात सतत थकवा जाणवतो. अशावेळी साधी कामं करतानाही लवकर दम लागतो आणि ऊर्जा कमी वाटू लागते. हा अशक्तपणा दिवसेंदिवस वाढू शकतो.

liver health symptoms

डोळे पिवळे पडणं

लिव्हर नीट काम करत नसल्यास त्वचा आणि डोळे पिवळे पडू लागतात. या स्थितीला कावीळ म्हणतात आणि ती लिव्हरच्या गंभीर समस्येचे संकेत असू शकतात. लघवी गडद रंगाची होणं आणि त्वचेवर खाज येणं अशी लक्षणंही दिसू शकतात.

abdominal pain right side liver

पोटफुगी

लिव्हरमध्ये गाठ असल्यास पोटात द्रव साचू लागतं. ज्यामुळे पोट फुगल्यासारखे दिसून लागतं. काही वेळा पायांमध्येही सूज येते. ही सूज हळूहळू वाढत जाते आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण करू शकते.

unexplained weight loss causes

मळमळ आणि उलट्या होणं

जर तुमच्या लिव्हरमध्ये गाठ असेल तर वारंवार मळमळ होणं किंवा उलट्या होणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अन्न पचत नसल्यामुळे किंवा लिव्हरचे कार्य बिघडतं आणि ही समस्या निर्माण होते.

jaundice symptoms adults

ताप

काही वेळा लिव्हरमध्ये गाठ असल्यास सौम्य ताप येऊ शकतो. शरीरात इन्फेक्शनसारखी लक्षणं जाणवू शकतात. इतकंच नाही तर संबंधित व्यक्तीला अंगदुखीचाही त्रास होतो. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.

liver problem signs

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा