Manasvi Choudhary
दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
दिवाळी म्हटलं की घरोघरी फराळ बनवला जातो. लाडू, चकली, करंजी, चिवडा हे पदार्थ घरोघरी बनवले जातात.
मात्र अनारसे हे खायला आवडतात पण ते बनवायचे कसे? हे अनेकांना माहित नाही. घरीच अनारसे बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
अनारसे बनवण्यासाठी तांदूळ, गूळ, खसखस, तेल हे साहित्य एकत्र करा.
बासमती तांदळापासून बनवलेले अनारसे चविष्ट असतात.अनारसे बनवण्यासाठी तांदूळ तीन दिवस भिजत घाला. त्यातील पाणी दररोज बदलून घ्यायचे आहे.
चौथ्या दिवशी तांदूळ पाण्यातून निथळून घेऊन सुती कपड्यावर वाळत घालायचे आहेत. यानंतर ते तादूंळ मिक्सरमध्ये बारीक वाटायचे आहेत.
मिक्सरला तांदूळ वाटल्यानंतर त्यात किसलेला गूळ मिक्स करा. गूळ आणि तांदळाचे पीठ मिक्स व्यवस्थित मिक्स करा.
गोळा तयार झाल्यानंतर चार ते पाच दिवस मुरण्यासाठी ठेवायचा आहे. प्लास्टिकचा डब्यात पिशवीमध्ये हे पीठ ठेवायचे आहे.
पाच दिवसानंतर पीठाचे छोटे छोटे गोळे करून चपटे करा त्याला खसखस लावा नंतर कढईत गरम तेलामध्ये अनारसे तळून घ्या.
कढईत अनारसे एकावेळी एकच तळून घ्या घाई करू नका. पुरी तळताना जास्त हलवू नये यामुळे खसखस करपेल.
अशाप्रकारे खुसखुशीत गरमा गरम अनारसे सर्व्हसाठी तयार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.