Dhaba Style Dal Tadka Recipe: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाइल तूर डाळ तडका, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

तूर डाळ स्वच्छ धुवा

तूर डाळ ४ ते ५ वेळा पाण्याने चांगली धुवून घ्या. पाणी थोडं स्वच्छ दिसू लागल्यावर डाळ साधारण २० ते ३० मिनिटे भिजत ठेवू शकता.

Dal Tadka Recipe | yandex

डाळ व्यवस्थित शिजवा

डाळीत पाणी, मीठ, हळद आणि थोडी हिंग घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवा. एक शिट्टी झाल्यानंतर गॅस मंद करून आणखी ७ ते १० मिनिटे शिजवण्याची पद्धत सांगितली आहे.

Dal Tadka Recipe | yandex

डाळ एकजीव करा

डाळ शिजल्यानंतर ती चमच्याने किंवा डावाने चांगली घोटून घ्या. डाळ जास्त घट्ट असल्यास गरम पाणी घालावे, तर पातळ असल्यास काही वेळ मंद आचेवर उकळावी.

Dal Tadka Recipe | yandex

तडका बनवण्यासाठी तूप वापरा

खमंग ढाबा स्टाइल तडक्यासाठी एका छोट्या कढईत एक चमचा तूप गरम करा. त्यात चिमूटभर हिंग आणि जिरे घालून फोडणी तयार करा.

Dhaba Style Dal Tadka Recipe | yandex

मसाल्यांचा योग्य वापर करा

जिऱ्याची फोडणी झाल्यानंतर काश्मिरी लाल तिखट, धणेपूड आणि गरम मसाला घाला. मसाले जास्त वेळ भाजू नका, अन्यथा ते जळून चव खराब होऊ शकते.

Dal Tadka | pinterest

गरम डाळीवर तडका ओता

तयार केलेला गरम हिंग-जिऱ्याचा तडका थेट गरम डाळीवर ओता. यामुळे डाळीला खास सुगंध आणि ढाब्यासारखी चव मिळते.

Dal Tadka | yandex

गरमागरम तूर डाळ सर्व्ह करा

तडका दिलेली तूर डाळ गरम भातासोबत सर्व्ह करा. सोबत सुकी भाजी किंवा लोणचं दिल्यास जेवणाची चव आणखी वाढते.

Dal Tadka | yandex

OTT Releases: शुक्रवारचा प्लॅन ठरला! OTT वर पाहा ॲक्शनपासून हॉररपर्यंत ६ जबरदस्त चित्रपट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OTT Releases
येथे क्लिक करा