Dental Health Care चुकीच्या उपायांनी दात पांढरे करण्याच्या नादात होईल मोठं नुकसान? जाणून घ्या सत्य

Saam Tv

हे 7 गैरसमज जाणून घ्या

सोशल मीडियावर दातांचे पिवळेपण घालवण्यासाठी आणि ओरल केअरसाठी अनेक घरगुती उपाय सांगितले जातात. परंतु, या उपायांमागील सत्य काय आहे.

Dental Health Care | PINTEREST

चारकोल टूथपेस्टने दात पांढरे होतात की नुकसान होते?

चारकोल टूथपेस्ट हा दात चमकवण्याचा एक सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय आहे. मात्र, चारकोल टूथपेस्ट सुरक्षित आहे याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.

Dental Health Care | PINTEREST

'ऑइल पुलिंग'ने दात खरोखर साफ होतात का?

ऑइल पुलिंगमुळे दात स्वच्छ होतात आणि यामुळे ब्रश किंवा फ्लॉस करण्याची गरज उरत नाही. ऑइल पुलिंगमुळे कॅव्हिटी दूर ठेवण्यास थोडी मदत होऊ शकते,परंतु हा ब्रशिंग आणि फ्लॉसिंगचा पर्याय होऊ शकत नाही.

Dental Health Care | PINTEREST

दररोज बेकिंग सोडाने दात घासणे सुरक्षित आहे का?

घरगुती बेकिंग सोडा वापरून दात घासल्याने पिवळेपणा निघून जातो आणि ते सुरक्षित आहे. बाजारात मिळणाऱ्या काही टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा असतो,पण घरी तयार केलेल्या बेकिंग सोडा पेस्टने रोज दात घासणे योग्य नाही.

Dental Health Care | PINTEREST

व्हाईटनिंग स्ट्रिप्स आणि LED किट्सचा घरी वापर करणे सुरक्षित आहे का?

ऑनलाइन मिळणाऱ्या व्हाईटनिंग स्ट्रिप्स आणि LED किट्सचा घरी वापर करून दात सहज सुरक्षितपणे पांढरे करता येतात.मात्र, व्हाईटनिंग स्ट्रिप्समध्ये हायड्रोजन पेरोक्साइड असते, जे योग्य पद्धतीने वापरले नाही तर दातांमध्ये जळजळ/त्रास निर्माण करू शकते.

Dental Health Care | PINTEREST

दात सुरक्षितपणे पांढरे करण्याचा योग्य मार्ग कोणता?

दात पांढरे करण्यापूर्वी पिवळेपणाचे नेमके कारण काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. डेंटिस्टकडून 'प्रोफेशनल क्लीनिंग' करून घेतल्यास दातांवरील प्लाक्स आणि टार्टर योग्य प्रकारे साफ होतो.

Dental Health Care | PINTEREST

प्रत्येक वेळी काही खाल्ल्यानंतर गुळण्या करणे आवश्यक आहे का?

खाल्ल्यानंतर साध्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील अन्नाचे कण, आम्ल आणि साखर निघून जाते. विशेषतः गोड किंवा ॲसिडिक पदार्थ खाल्ल्यानंतर ही एक उत्तम सवय आहे.

Dental Health Care | PINTEREST

टूथब्रश कधी बदलावा?

सामान्य असो वा इलेक्ट्रॉनिक, दोन्ही प्रकारचे टूथब्रश दर ३ ते ४ महिन्यांनी बदलले पाहिजेत. खराब झालेल्या ब्रिसल्समुळे दातांची योग्य प्रकारे सफाई होत नाही.

Dental Health Care | PINTEREST

NEXT : तोंडाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? जाणून घ्या तोंडाचा वास घालवण्याचे नैसर्गिक उपाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NATURAL REMEDIES FOR BAD BREATH | SAAM TV
येथे क्लिक करा