Chetan Bodke
बॉलिवूडची टॉप अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या हटके स्टाइल आणि लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
जान्हवी कपूर इंडियन वेअरप्रमाणे वेस्टर्न वेअरमध्ये देखील खूपच सुंदर दिसते.
सोशल मीडियावरील तिच्या ग्लॅमरस अदांची तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.
नुकतंच जान्हवीने सोशल मीडियावर एक सुंदर साडी परिधान करत फोटोशूट शेअर केलं आहे.
जान्हवीने २०२४ या वर्षातले पहिले वहिले फोटोशूट नेटकऱ्यांसोबत शेअर केले आहेत.
"आणि आता २०२४ हे वर्ष सुरु झालंय" फोटोला अशी कॅप्शन देत अभिनेत्रीने सोशल मीडियावर पांढऱ्या रंगातील गोल्डन साडीतले फोटो शेअर केले.
पांढऱ्या रंगाची साडी परिधान करत नो मेकअप लूक करत जान्हवीने तिरुपती बालाजीचे दर्शन केले.
जान्हवीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. या फोटोंना ६ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
जान्हवी येत्या आगामी वर्षामध्ये, 'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.