Chetan Bodke
बिग बॉस फेम अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने एकत्रित सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली.
दोघांचीही भेट 'बिग बॉस मराठी ४'च्या घरामध्ये झाली आहे. घरातून बाहेर आल्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले.
अमृता एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती टॉकरवाडी या रेडिओ चॅनलवर रेडिओ जॉकी सुद्धा होती.
अमृता सध्या 'नियम व अटी लागू' या नाटकात काम करत असून नाटकाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अमृता नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. तिने नुकतंच इन्स्टाग्राम नवं फोटोशूट शेअर केलं आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने मस्टर्ड येलो कलरचा कुर्ता आणि लाईट पिंक कलरचा पायजमा तिने घातला आहे.
या लूकवर अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप, गळ्यामध्ये फॅशनेबल माळ आणि मोकळे केस सोडून आपला लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्रीच्या ह्या नव्या लूकची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.