Pimpri Chinchwad: लांब जाऊच नका! पिंपरी-चिंचवडजवळ आहेत ही बेस्ट थंड हवेची ठिकाणं

Surabhi Jayashree Jagdish

पिंपरी चिंचवड

उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात पिंपरी-चिंचवड परिसरातील लोक थंडावा मिळवण्यासाठी जवळच्या डोंगराळ आणि निसर्गरम्य ठिकाणांचा पर्याय निवडतात. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेली ही ठिकाणं थंड हवा, हिरवाई आणि शांत वातावरणामुळे खास आकर्षण ठरतात.

pimpri chinchwad travel

लोणावळा

लोणावळा हे पिंपरी चिंचवडपासून सुमारे 60-70 किमी अंतरावर असून पटकन पोहोचता येणारे हिल स्टेशन आहे. याठिकाणी भुशी डॅम, टायगर पॉईंट आणि कार्ला-भाजा लेणी यांसारखी थंड हवेची ठिकाणं आहेत.

hill stations near pune

खंडाळा

खंडाळा हे लोणावळ्याच्या अगदी जवळ असून अधिक शांत आणि कमी गर्दीचे ठिकाण मानलं जातं. इथे डोंगर, धुकं आणि दऱ्यांचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं. जे उन्हाळ्यातही थंडावा देतात.

lonavala trip

लवासा

लवासा हे आधुनिक हिल स्टेशन असून पुण्याजवळ सुमारे 60-80 किमी अंतरावर आहे. तलावाच्या काठावर असल्यामुळे येथे हवामान थंड आणि वाऱ्यामुळे सुखद वाटते. बोटिंग, सायकलिंग आणि शांत फिरण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

khandala tourism

मुळशी

मुळशी हे पुण्याजवळील शांत आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे जे उन्हाळ्यात थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. मुळशी धरण आणि त्याचे बॅकवॉटर परिसरात गारवा टिकवून ठेवतात. कॅम्पिंग, बर्ड वॉचिंग आणि निसर्गात वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

nature places near pune

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे सह्याद्रीतील उंचावर असलेलं हिल स्टेशन असल्यामुळे याठिकाणी उन्हाळ्यातही हवामान खूपच थंड राहतं. स्ट्रॉबेरी शेती, व्ह्यू पॉइंट्स आणि धबधबे यामुळे हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे.

travel guide pune

दुर्गा टेकडी

दुर्गा टेकडी हे पिंपरी चिंचवडमध्येच असलेलं एक ठिकाण आहे. हजारो झाडांमुळे याठिकाणी हवा ताजी आणि थंड वाटतं. छोट्या पिकनिकसाठी किंवा रिलॅक्स होण्यासाठी हे उत्तम पर्याय आहे.

family trips

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad fort history | saam tv
येथे क्लिक करा