Wakad Tourism: वाकडपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत ही थंड हवेची ठिकाणं; या विकेंडला करा प्लान

Surabhi Jayashree Jagdish

वाकड

उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे पुण्याच्या वाकड परिसरात राहणाऱ्यांना थोडा थंडावा शोधण्याची इच्छा होते. शहराच्या गोंधळापासून दूर जाऊन हिरवळ, डोंगर आणि पाण्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची मजा काही वेगळीच असते. वाकडजवळ अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला थंड हवेची मजा घेऊ शकता.

लोणावळा

लोणावळा हे वाकडपासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेले प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. याठिकाणी हिरवेगार डोंगर, धबधबे आणि थंड वारे यामुळे उन्हाळ्यातही गारवा जाणवतो.

wakad pune travel

खंडाळा

खंडाळा हे लोणावळ्याच्या अगदी जवळ असून शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. याठिकाणी कमी गर्दी असल्यामुळे तुम्हाला शांत वातावरणात वेळ घालवता येतो. ड्यूक्स नोज आणि राजमाची पॉइंट देखील या ठिकाणी आहेत.

places near pune

पावना लेक

पवना लेक हे वाकडपासून जवळचं सुंदर आणि शांत ठिकाण आहे. याठिकाणी तुम्ही कॅम्पिंग, बोटिंग आणि सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. पाण्याच्या काठावर बसून थंड वाऱ्याचा अनुभव खूप सुखद असतो.

summer destinations pune

मुळशी डॅम

मुळशी धरण परिसर हा निसर्गप्रेमींसाठी उत्तम पर्याय आहे. याठिकाणची हिरवीगार झाडं, डोंगर हे दृश्य मनाला शांत करतं. उन्हाळ्यातही याठिकाणी थंडावा जाणवतो आणि ड्राईव्हसाठीही हा मार्ग खूप सुंदर आहे.

hill stations near pune

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट हा वाकडपासून थोड्या अंतरावर असलेला अत्यंत रमणीय घाट आहे. याठिकाणी धुके, हिरवळ आणि थंड हवा यामुळे वातावरण खूप प्रसन्न असतं. फोटोग्राफी आणि नेचर वॉकसाठी हे ठिकाण उत्तम आहे.

lonavala trip

राजमाची फोर्ट

राजमाची किल्ला हा ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असून निसर्गाचा जवळून अनुभव देतो. किल्ल्यावरून आजूबाजूचा नजारा अत्यंत सुंदर दिसतो आणि वातावरण खूपच गार असतं. ट्रेकिंग आवडणाऱ्या लोकांसाठी हा चांगला पर्याय आहे.

khandala tourism

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivaji Maharaj history
येथे क्लिक करा