सांम टीव्ही न्यूज
बॉडीबिल्डिंगचा बादशाहा म्हणून आजही ज्याची ओळख आहे तो म्हणजे 'अरनॉल्ड श्वार्झनेगर'.
अरनॉल्ड त्याच्या निकटवर्तीयात 'अर्नी' या टोपणनावाने प्रसिद्ध आहे.
30 जुलै 1947 रोजी ऑस्ट्रियामधील थाल येथे अरनॉल्डचा जन्म झाला.
त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने पोलीस अधिकारी व्हावं आणि आईची इच्छा होती की त्यानं शिक्षक व्हावं. मात्र त्याने वेगळाच मार्ग निवडला आणि बॉडीबिल्डिंगचा बादशाहा झाला.
1970 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी सर्वात तरुण मिस्टर ऑलिम्पियाचा किताब जिंकला आहे. हा एक विक्रम आहे, जो 2023 मध्ये अजूनही त्याच्या नावावर आहे.
त्याने 1970-75 मध्ये एकूण 7 वेळा मिस्टर ऑलिंपिया जिंकला आहे. एकदा शेवटच्या वेळी हा किताब जिंकायचा असं म्हणून त्याने 1980 मध्ये पुनरागमन केलं आणि तो यशस्वी झाला.
प्रमुख अभिनेता म्हणून 30 हून अधिक हॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.
'टर्मिनेटर' या चित्रपटातील त्याच्या पत्रामुळे त्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली.
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर म्हणून त्याने दोन वेळा काम केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.