Chetan Bodke
‘तुझ्यात जीव रंगला’ ही टेलिव्हिजनवरील फेमस सीरियल आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
मालिकेत मुख्य भूमिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर होते. यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.
हे रिल लाईफ कपल रियल लाईफमध्ये ही एकमेकांचे जोडीदार आहेत.
हार्दिक आणि अक्षयाने मालिका संपल्यानंतर लग्न केलं. त्यानंतर अक्षयाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. ती टेलिव्हिजनपासून दूर आहे.
लग्नानंतर हार्दिक जरीही फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय असला तरीही अक्षया फारशी सक्रिय नाही.
अक्षया फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असून ती आता बिझनेस वूमन झाली आहे.
लग्नानंतर अक्षया आता काय करते? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच आतूर होते.
‘भरजरी’ नावाच्या साड्यांचा ब्रँड तिनं लाँच केला आहे. लवकरच तिच्या साड्यांचं ती दालनही सुरू करणार आहे.
अक्षयाने हा व्यवसाय तिच्या दोन मैत्रिणींसोबत सुरू केला आहे. चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटी मित्रांकडून अक्षयाला तिच्या या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा मिळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.