Airfare : सणासुदीच्या काळात मुंबईतून विमान प्रवास प्रचंड महागणार

Sandeep Gawade

विमान भाडे 25 टक्क्यांनी वाढलं

रक्षाबंधन आणि जन्माष्टमी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. कामानिमित्त आणि शिक्षणासाठी कामानिमित्त घरापासून दूर असलेल्यांनी आधीच घरी परतण्यासाठी तिकिटे बुक केली आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमान भाडे 25 टक्क्यांनी वाढलं आहे

Airfare | Yandex

20 ते 30 हजार रुपयांपर्यंत तिकिट

दिवाळीनिमित्त देशातील प्रमुख मार्गांवरील भाडे गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढले आहे. काही विमानांची तिकिटे 20 ते 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहेत.

Airfare | Yandex

मुंबई ते चेन्नई

मुंबई ते चेन्नई या विमानाच्या तिकीटाची किंमत 5,000 रुपयांपेक्षा अधिक आहे, तर गेल्या वर्षीचे भाडे सुमारे 4,400 रुपये होते.

Airfare | Yandex

मुंबई-गोवा

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्यांना यावेळी तिकीट बुकिंगसाठी ३८१२ रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई-गोवा विमान प्रवासाटीचे तिकिट 2023 मध्ये 3294 रुपये होते. यावेळी त्यात 15.7 टक्के वाढ झाली आहे.

Airfare | Yandex

मुंबई ते जयपूर

गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबई ते जयपूरचे भाडे १६.१ टक्क्यांनी वाढले आहे. २०२३ मध्ये मुंबई ते जयपूरला जाण्यासाठी ५५६२ रुपये तिकीट मिळत होते, तर यंदा तिकीट ६४५८ रुपये झालं आहे.

Airfare | Yandex

फ्लाइटची संख्येतही घट

नोव्हेंबरसाठी मुंबई-जयपूर मार्गावरील नियोजित फ्लाइटची संख्या 154 असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.7 टक्क्यांनी कमी आहे.

Airfare | Yandex

मुंबई ते हैदराबाद

दिवाळीत मुंबई ते हैदराबाद प्रवास करण्यासाठी ५०८१ रुपये मोजावे लागणार आहेत. मागील वर्षी हेच तिकिट ४२६८ रुपये होते. मुंबई ते हैदराबाद विमान तिकिटात यंदा २०.९ टक्के वाढ झाली आहे.

Airfare | Yandex

हे ही पहा

इथे क्लिक करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Digital | Yandex
PM नरेंद्र मोदींचं पुणेकरांना मोठं गिफ्ट