Health Tips : सावधान! जेवणानंतरची एक चूक पडेल महागात,आताच सोडा 'ही' सवय

Shreya Maskar

रात्रीचे जेवण

जेवणानंतर तुम्ही लगेच झोपत असाल तर ही चूक करणे आताच टाळा. जेवणानंतर पटकन झोपल्यावर शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात.

Health Tips | yandex

पोटासंबंधित आजार

तज्ज्ञांचे मते, पोटभर जेवणानंतर लगेच झोपायला गेल्याने पोटासंबंधित समस्या निर्माण होतात. ॲसिडीटीचा त्रास उद्भवतो. पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत वाहू लागते. जेवल्यानंतर लगेच झोपले की, छातीत जळजळ होते, आंबट ढेकर येतात आणि पोट जड होते.

Health Tips | yandex

गुरुत्वाकर्षणचे शास्त्र

जेवल्यानंतर चालण्याचा सल्ला गुरुत्वाकर्षणाच्या शास्त्रावर आधारित आहे. आपली पचनसंस्था सरळ नळीसारखी काम करते. जेव्हा आपण सरळ बसतो किंवा उभे राहतो तेव्हागुरुत्वाकर्षणची शक्ती अन्न आणि पाचक रसांना खाली दाबते. ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीतपणे पुढे जाऊ शकते.

Health Tips | yandex

छातीत जळजळ

आपण जेवल्यानंतर लगेच आडवे झोपताच, हे नैसर्गिक संतुलन बिघडते. पोटातील आम्ल वरच्या दिशेने वाहते, ज्यामुळे छातीत जळजळ होते.

Health Tips | yandex

झोपणे टाळा

लक्षात ठेवा रात्री पचायला जड जाणारे अन्न खाऊ नये. तसेच जास्त जेवू नये आणि जेवल्यावर पटकन झोपू नये.

Health Tips | yandex

जेवणाची वेळ

रात्री 9 च्या आत जेवण करा. तसेच जेवल्यावर 15-20 मिनिटे शतपावली करा. ज्यामुळे अन्न लवकर पचते आणि शरीराला देखील लागते.

Health Tips | yandex

ॲसिडीटीचा त्रास

जेवल्यावर पटकन झोपले की, शरीर जड राहते, गॅस, पोटफुगी आणि झोपेची गुणवत्ता देखील खराब होऊ शकते. मन अस्वस्थता राहते. तसेच सकाळी थकवा जाणवतो.

stomach pain | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Stomach pain | yandex

NEXT : तांदूळ, डाळ, बटाटे शिजवताना कुकरच्या किती शिट्ट्या कराव्या?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cooking Tips
येथे क्लिक करा...