Shruti Vilas Kadam
Lakshmi Niwas Marathi serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ आता एका नव्या ट्विस्टकडे वळत आहे. या मालिकेतील जयंत, जान्हवी आणि लक्ष्मी यांच्या आयुष्यात मोठं वादळ येणार असल्याचं संकेत नवीन प्रोमोमधून मिळाले आहेत.
नवीन भागात लक्ष्मी आणि श्रीनिवास आनंदात आहेत, पण लक्ष्मीला काहीतरी जाणवतं. ती जयंतला फोन करून म्हणते, “तुम्ही आणि जानू देवळात जाऊन देवाचा आशीर्वाद घ्या, भाऊबीज आहे ना!” या शब्दांनंतर जयंतच्या चेहऱ्यावर एक भावनिक छटा दिसते, आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. इथूनच पुढील भागात मोठं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.
प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, जयंत आपल्या भूतकाळातील सत्य लपवत आहे त्याने जान्हवीला सोडून दिलं आहे आणि तिच्या आयुष्यात मोठं दु:ख दिलं आहे. आता तो हे सत्य लक्ष्मीला सांगणार का, हा प्रश्न प्रेक्षकांना सतावतोय. दुसरीकडे, जान्हवी जयंतच्या वागणुकीमुळे पूर्णपणे तुटली आहे आणि ती एका टोकाच्या निर्णयाच्या मार्गावर आहे.
जान्हवी स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तिच्या आयुष्यातील दु:ख आणि जयंतच्या वागणुकीचा परिणाम आता गंभीर वळण घेणार आहे. जयंतने पूर्वी जान्हवीच्या आजीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, हे रहस्यसुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. या सर्व घटनांमुळे मालिकेत प्रेक्षकांना नवा धक्का बसणार आहे. ‘लक्ष्मी निवास’च्या आगामी भागात सत्य आणि नात्यांतील गुंतागुंत उघड होणार असून, जयंत अखेर लक्ष्मीला सगळं खरं सांगणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.