Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये मोठा ट्विस्ट; ११ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, फक्त ३ सदस्य सेफ

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’च्या घरातील वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने स्काउट, आसिफ खान यांच्यासह काही स्पर्धकांची कानउघाडणी केली. याच भागात पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. ईशाच्या एक्झिटनंतर आता शोच्या चौथ्या आठवड्यात नॉमिनेशनचा मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.

‘बिग बॉस २०’च्या तिसऱ्या आठवड्यात ईशा रिखी आणि यंग डीएसए नॉमिनेट झाले होते. अखेर ‘वीकेंड का वार’मध्ये ईशाला घराबाहेरचा मार्ग दाखवण्यात आला. त्यामुळे शोमध्ये आता नॉमिनेशनचा नवा टप्पा सुरू झाला आहे.

नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा ट्विस्ट

सोमवार, २८ सप्टेंबर रोजी बिग बॉसने चौथ्या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कची घोषणा केली. या टास्कमध्ये स्पर्धकांना जोड्यांमध्ये पाठवण्यात आले. प्रत्येकाने परस्पर संमतीने कोणाला नॉमिनेट करायचे हे ठरवायचे होते. मात्र, कोणामध्येच एकमत झाले नाही, त्यामुळे स्पर्धकांमध्ये पेच निर्माण झाला आणि ११ स्पर्धकांनवर नॉमिनेशनची टांगती तलवार आली.

११ स्पर्धक डेंजर झोनमध्ये

नॉमिनेशन टास्कनंतर तब्बल ११ स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये रिती तिवारी, आम्रपाली दुबे, माही विज, स्काउट, काझी तौकीर, उदिती सिंह, अमन गांधी, कनिका मान, यंग डीएसए, लव्हप्रीत गिल आणि मेरी कोम यांचा समावेश आहे.रिती तिवारी आणि आम्रपाली दुबे यांच्यात नॉमिनेशनबाबत एकमत झाले नाही. त्यामुळे दोघींनाही नॉमिनेट करण्यात आले. त्यानंतर माही विज आणि अरिशफा खान यांची जोडी आली. माहीने स्वतःला नॉमिनेट करून अरिशफाला सुरक्षित केले.

यानंतर आसिफ खान आणि स्काउट यांची जोडी आली. स्काउटने स्वतःला नॉमिनेट करून आसिफला सुरक्षित केले. काझी तौकीर आणि उदिती सिंह यांच्यातही एकमत झाले नाही आणि दोघेही नॉमिनेट झाले. अमन गांधी आणि कनिका मान यांच्यातही सहमती न झाल्याने दोघांनाही नॉमिनेशनचा सामना करावा लागला. शेवटी यंग डीएसए, लव्हप्रीत गिल आणि मेरी कोम यांच्या गटातही एकमत न झाल्याने तिघेही डेंजर झोनमध्ये गेले.

फक्त तीन स्पर्धक सेफ

या टास्कनंतर गुल्लू, अरिशफा खान आणि आसिफ खान हे तीन सदस्य या आठवड्यात सुरक्षित राहिले आहेत. त्यामुळे बाकीच्या ११ सदस्यांवर आता एलिमिनेशनची टांगती तलवार आहे. पुढील काळात प्रेक्षकांच्या मतांमुळे कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास कायम राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.