ब्लँकेट्स न धुता कशी स्वच्छ करावीत? सोप्या ट्रिक्सनं कुबट वास होईल गायब

Bharat Jadhav

ब्लँकेटमधील कुबट वास

अनेक महिने बंद कपाटात ठेवलेल्या ब्लँकेट आणि पांघरुणांमध्ये धूळ, ओलावा आणि एक प्रकारचा नकोसा वाटणारा कुबट वास येतो. ऐन थंडीच्या दिवसांत ही पांघरुणे धुणे आणि वाळवणे हे मोठे डोकेदुखीचे काम वाटते. पण काळजी करू नका! ब्लँकेट किंवा गोधडी न धुताही त्यांचा हा दुर्गंध सहज घालवून शकता, त्याच्या ट्रिक्स जाणून घ्या.

ब्लँकेट किंवा गोधडी उन्हात ठेवा

ब्लँकेट किंवा पांघरुणे कपाटातून बाहेर काढल्यानंतर सर्वप्रथम ती नीट झटकून त्यातील धूळ काढून टाकावी. त्यानंतर ती अशा ठिकाणी पसरवा जिथे पुरेसा सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा मिळेल.

कितीवेळ ब्लँकेट वाळवण्यास ठेवायची?

सलग 3-4 दिवस नियमितपणे ब्लँकेटला कडक ऊन दाखवा जेणेकरून ओलावा आणि कुबट वास नाहीसा होईल.

बेकिंग सोड्याचा वापर करा

ब्लँकेटमधून जास्त प्रमाणात कुबट वास येत असेल,तर बेकिंग सोडा फायदेशीर ठरू शकतो. बेकिंग सोड्यामध्ये काही थेंब इसेन्शियल ऑइल मिक्स करुन पेस्ट बनवा आणि ज्या भागातून जास्त वास येत आहे तिथे ही पेस्ट लावा.साधारण ३० मिनिटे तसेच ठेवल्यानंतर ब्रशच्या सहाय्याने तो भाग स्वच्छ करा.

पांढऱ्या व्हिनेगरचा हलका स्प्रे करा

पांघरुणांमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी पांढरे व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात मिसळून एक द्रावण तयार करा. हे द्रावण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि ब्लँकेटवर हलक्या हाताने स्प्रे करा.यानंतर ब्लँकेट काही वेळ मोकळ्या हवेत आणि उन्हात चांगले वाळू द्या.

कापूर आणि लवंग

सुती कपड्यात कापूर अन् लवंग बांधून कपाटात किंवा ब्लँकेटमध्ये ठेवा.कापुराच्या सुगंधाने कुबट वास निघून जातो आणि कीटकही लांब राहतात.

इसेन्शिअल ऑइल स्प्रे

एका स्प्रे बॉटलमध्ये पाण्यात लेव्हेंडर किंवा टी-ट्री ऑईलचे काही थेंब मिसळा. केटवर हलका स्प्रे करा,यामुळे छान सुगंध येईल.

कडूनिंबाची पाने

गोधडी किंवा ब्लँकेट घडी घालून ठेवताना वाळलेली कडुनिंबाची पाने ठेवा. मुळे बुरशी लागत नाही आणि कपडे सुरक्षित राहतात

खबरदारी

प्लास्टिकच्या पिशवीत ब्लँकेट बंद करून ठेवणे टाळा. हमी कॉटन बॅग किंवा हवेशीर ठिकाणीच साठवणूक करा.

टीप

जर ब्लँकेट खूप वर्षांपासून धुतले नसेल किंवा दुर्गंधी जास्त असेल, तर ते चांगल्या प्रकारे धुवून घेणेच योग्य राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.