गाडीच्या चाकांवर रबरी काटे का असतात?

Surabhi Jagdish

अनेकदा तुम्ही गाड्यांच्या टायरवर रबरी काटे असल्याचं पाहिलं असेल.

पण हे रबरी काटे का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

याचं उत्तर 99% कारचालकांनाही माहिती नसेल

नवीन टायर रबरमधील या काट्यांना स्पाइक, टायर निब्स, गेट मार्क्स किंवा निप्पर्स असेही म्हणतात.

टायरवरील रबर स्पाइक्स उत्पादनादरम्यान आपोआप तयार होतात.

टायर बनवण्यासाठी टायरच्या साच्यात द्रव रबर ओतला जातो. यावेळी यामध्ये असलेली हवा बाहेर काढली जाते.

रबरमधील हवा लहान छिद्रातून बाहेर पडू लागते. या प्रक्रियेत या छिद्रांमधून काही प्रमाणात रबरही बाहेर पडतो. थंड झाल्यानंतर याचा आकार काट्यासारखा दिसतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.