Chetan Bodke
आपण अनेकदा बस नसेल किंवा बसला गर्दी असेल तर रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करतो.
पण तुम्हाला कधी तरी असा प्रश्न पडलाय का? मुंबईच्या रस्त्यावर का रिक्षा धावत नाही?
मुंबईच्या रस्त्यांची रचना ब्रिटिश काळापासून फार अरुंद असल्यामुळे पटकन ट्रॅफिक होते.
मुंबईमध्ये ऑटो रिक्षाला विरोध होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, मुंबईतील रस्ते, रिक्षाची असलेली ओबडधोबड साईज, पार्किंगचे नियम या अशा अनेक कारणांमुळे विरोध होत आहे.
सोबतच मुंबईमध्ये उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू मंडळींची वस्ती असल्यामुळे खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे देखील ऑटो रिक्षाला विरोध होत आहे.
मुंबईमध्ये घर खरेदी करण्याचे प्रमाण आणि नवीन कंस्ट्रक्टरचे प्रमाण जास्त आहे, रिक्षांची रहदारी ज्या भागात जास्त असते, त्या भागामध्ये नव्या घरांची किंमत कमी होते.
ठाणे, नवी मुंबई, उत्तर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात ऑटो रिक्षाची मागणी सर्वाधिक आहे. त्या मानाने मुंबईमध्ये ऑटो रिक्षाची मागणी फार कमी आहे.
मुंबईमध्ये पहिल्यांदा टॅक्सी १९६४ मध्ये धावली होती. तिला काळी पिवळी म्हणून देखील संबोधतात, त्यानंतर रिक्षा बाजारात आली.
‘ऑल थिंग्स मुंबई’या वेबसाईटने ही सर्व माहिती एका रिपोर्टमध्ये दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.