Priya More
नाशिकच्या टीसीएस कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव म्हणजे निदा खान.
नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानसोबत ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
निदा खान ही नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये एचआर मॅनेजर पदावर कार्यरत होती. ती या प्रकरणातील मास्टरमाईंड होती असा पोलिसांना संशय आहे.
हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी निदा खान फरार आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत.
निदा खान ही या कंपनीत फक्त एचआरच्या भूमिकेपूरती मर्यादित नव्हती तर ती टीम लीडर्ससोबत दिसायची.
टीसीएस कंपनीतील सहकारी कर्मचारी तिला दबंग मॅम म्हणत होते. तिला ऑफिसमधील सर्वजण घाबरत होते.
ती कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना कसे कपडे घालावेत, बुरखा का घालावा आणि इस्लामी परंपरांचे पालन कसे करायचे हे सांगायची.
निदा खानचे लग्न झाले होते आणि ती मुंब्र्यामध्ये नवऱ्यासोबत राहत होती. त्याआधी ती नाशिक आणि भिवंडीत राहत होती.
निदा खान दोन महिन्यांची गरोदर असल्याची माहिती तिच्या आईने कोर्टात सांगितली. निदाच्या नवऱ्याचीही पोलिसांनी ४ तास चौकशी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.