Google Data Privacy: तुम्ही गुगलवर टाइप केलेली माहिती कुठे आणि कोणाकडे जाते?

Dhanshri Shintre

गुगल

डिजिटल युगात गुगल जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. माहिती शोधणे, खरेदी, मार्गदर्शन किंवा आजारांची लक्षणे जाणून घेण्यासाठी लोक थेट गुगलचा वापर करतात.

गुगलवर शोधलेली माहिती कुठे जाते

कधी विचार केला आहे का, गुगलवर शोधलेली माहिती कुठे जाते, कोण पाहते आणि ती माहिती नेमकी कशा प्रकारे वापरली जाते?

सर्च डेटा

या लेखात जाणून घ्या, तुमच्या गुगल सर्च डेटाचे नेमके काय होते, ती कोठे साठवली जाते आणि त्यामागील खरे सत्य काय आहे.

भविष्यातील नोंद

तुम्ही गुगलवर शब्द, प्रश्न किंवा वाक्य टाइप करता तेव्हा, गुगल ते फक्त उत्तरासाठी नव्हे तर भविष्यातील नोंद आणि विश्लेषणासाठीही जतन करते.

डेटाबेसमध्ये साठवून ठेवते

गुगल तुमचे टाइप केलेले कीवर्ड, स्थान, डिव्हाइस तपशील, शोधाची वेळ आणि क्लिक केलेल्या लिंक्सची सर्व माहिती नोंदवून आपल्या डेटाबेसमध्ये साठवून ठेवते.

उपयुक्त शोध

गुगल सांगते की, यूजर्सना अधिक अचूक आणि उपयुक्त शोध परिणाम देण्यासाठीच ते कीवर्ड, स्थान, डिव्हाइस तपशील आणि इतर सर्व माहिती गोळा करते.

तृतीय पक्षांसोबत शेअर

कायद्यानुसार आवश्यक असेल, जसे न्यायालयाचा आदेश मिळाल्यास, तेव्हाच Google तुमची वैयक्तिक माहिती तृतीय पक्षांसोबत शेअर करते; अन्यथा ती गुप्त ठेवते.

अनामिक डेटा

कंपनी धोरणानुसार काही भागीदार अनामिक डेटा देतात, तर जाहिरात कंपन्यांना तुमच्या ऑनलाइन वर्तनानुसार वैयक्तिकृत जाहिराती दाखवण्याची मुभा दिली जाते.

जागतिक डेटा सेंटर

तुमचा डेटा गुगलच्या विविध जागतिक डेटा सेंटरमध्ये सुरक्षितपणे संग्रहित केला जातो, जो इंटरनेटवर आधारित क्लाउड सर्व्हरवर ठेवला जातो.

NEXT: विमानातील सर्वोत्तम सीट कशी निवडावी? तिकीट बुकिंगपूर्वी जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा