Bharat Jadhav
पावसाळ्यात किंवा बाईक धुताना अनेकदा चुकून बाईकच्या पेट्रोल टाकीत पाणी जाते. यामुळे बाईक सुरू होण्यात अडचण येत असते. इतकेच नाहीतर इंजिनचे नुकसानही होऊ शकते. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. काही सोप्या पद्धतींचा वापर करून ही समस्या सोडवता येते.
जर इंधन टाकीमध्ये पाणी गेले असेल तर ती पूर्णपणे रिकामी कर. यामुळे पेट्रोलमधून पाणी वेगळे करणे सोपे जाते. इंजिनचे नुकसान टाळण्यास मदत होते.
टाकीतील पेट्रोल बाहेर काढण्यासाठी एका स्वच्छ आणि कोरड्या बाटलीचा वापर करा. टाकी पूर्णपणे रिकामी होईपर्यंत त्यातून पेट्रोल काढून घ्या.
इंधनाची टाकी रिकामी झाल्यावर ती काही वेळ सुकू द्या.जेणेकरून त्यातील ओलावा निघून जाईल आणि पाणी पूर्णपणे सुकेल.
पाणी आणि पेट्रोल वेगळे झाल्यावर काळजीपूर्वक पाणी काढून टाका. उरलेले पेट्रोल पुन्हा वापरता येईल.
पाणी वेगळे केल्यानंतर, उरलेले पेट्रोल पुन्हा इंधन टाकीत टाकून वापरता येतं. जर तुम्हाला टाकीत अजूनही पाणी राहिल्याचा संशय असेल किंवा बाईक तरीही सुरू होत नसेल, तर ती मेकॅनिककडून नक्की तपासून घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.