Surabhi Jayashree Jagdish
चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी आणि हायड्रॉक्सिलचे संकेत सापडले असून हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेल्या रेणूला हायड्रॉक्सिल म्हणतात.
प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ रॉजर क्लार्क यांच्या म्हणण्यानुसार, लांबून पाहिल्यावर चंद्र खूपच कोरडा दिसतो. त्यामुळे पृष्ठभागावर द्रवरूप पाणी जमा होत नाही.
चंद्राच्या पृष्ठभागावर नद्या किंवा तलाव नसले तरी त्यामध्ये भरपूर पाणी लपलं असल्याचं अभ्यासातून दिसून आलंय.
अनेक अभ्यासातून असं दिसून आलंय की, उच्च अक्षांशांवर चंद्राच्या खड्ड्यांमध्ये पाणी खोलवर असू शकतं.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चंद्रावर बर्फ साचलेला असू शकतो.
नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून चंद्राच्या इतर भागात देखील पाणी असू शकतं, असं म्हटलंय. संशोधकांना असे संकेत मिळालेत की चंद्रावर पाणी आणि हायड्रॉक्सिल मुबलक प्रमाणात असू शकतात.
शास्त्रज्ञांनी चंद्रावर असलेल्या खनिजांचा नकाशा तयार केला, ज्यामुळे त्या ठिकाणी पाण्याच्या अस्तित्वाचे संकेत मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.