ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रेल्वेनं प्रवाशांना पुन्हा एकदा छान गिफ्ट दिलं आहे, आजपासून (११ एप्रिल) शताब्दी एक्सप्रेसमध्ये विस्टाडोम कोच सुरु होत आहे.
यामुळे प्रवाशांना आता विहंगम आणि नयनरम्य दृश्यांचा आनंद घेता येणार आहे. यासाठी कोचमध्ये खास मोकळी जागा असेल.
ट्रेन क्रमांक १२००९/१० मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल शताब्दी एक्स्प्रेसमध्ये एक व्हिस्टाडोम कोच तात्पुरत्या स्वरुपात जोडण्यात आला आहे.
11 एप्रिलपासून मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या कॅपिटल शताब्दी एक्सप्रेस (12009/12010) ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच बसवले गेले आहेत.
व्हिस्टाडोम कोचमध्ये काचेच्या मोठ्या खिडक्या, काचेचे छप्पर, फिरणारी आसने आणि निरिक्षण विश्रामगृह यांचा समावेश आहे.
विस्टाडोम कोचमध्ये 44 प्रवासी बसण्याची क्षमता आहे.
रेल्वे आतापर्यंत अशा एकूण 45 ट्रेन चालवत आहे ज्यामध्ये असे विस्टाडोम कोच बसवण्यात आले आहेत. एसीमुळे प्रवास गारेगार होणार आहे.
ट्रेनमध्ये प्रत्येक सीटवर जास्तीत जास्त लेग स्पेस उपलब्ध आहे. यासोबतच ट्रेनमध्ये वायफाय सुविधाही उपलब्ध आहे.
आरामदायक, शांत आणि गारेगार प्रवासामुळे तुमच्या वाचनातही खंड पडणार नाही.
या कोचबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.