Shivani Tichkule
यावर्षी 8 मे 2022 रोजी मदर्स डे साजरा केला जात आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो.
आई ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पहिल्यांदाच आई-वडील झालेल्या सर्व कलाकारांचा आजचा मदर्स डे खूप खास आहे.
अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि सुयश राय २६ ऑगस्ट २०२१ रोजी एका लेकाचे पालक बनले आहेत. त्यांनी आपल्या मुलाचे नाव निरवैर असे ठेवले आहे.
आदित्य नारायणची पत्नी अभिनेत्री श्वेता अग्रवालने देखील २४ फेब्रुवारी २०२२ रोजी एका मुलाला जन्म दिला आहे.
पूजा बॅनर्जी आणि संदीप सेजवाल यावर्षी १३ मार्च २०२२ रोजी एका चिमुकलीचे आई- वडील बनले आहेत. त्यांनी आपल्या मुलीचे नाव सना असे ठेवले आहे.
ये रिश्ता क्या कहलाता है फेम मोहिना कुमारीने १५ एप्रिल २०२२ रोजी मुलाला जन्म दिला. अभिनेत्री मोहिना कुमारी सिंग आणि तिचा पती सुयश रावत पहिल्यांदाच आई-वडील झाले आहेत.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया दोघेही आपल्या गोंडस मुलासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहेत. भारती सिंहने ३ एप्रिल २०२२ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला.
देबिना आणि गुरमीत चौधरी यांच्या घरी ३ एप्रिल २०२२ रोजी एका चिमुकल्या परीचे आगमन झाले. या चिमुकलीचे नाव लियाना आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.