मेंदूच्या नसा कमकुवत झाल्या की शरीर देतं हे संकेत

Surabhi Jayashree Jagdish

मेंदूच्या नसा

मेंदूच्या नसा कमकुवत होऊ लागला त्याचा परिणाम शरीराच्या अनेक क्रियांवर दिसू लागतो. नसा हे मेंदू आणि शरीरातील अवयव यांच्यात संदेश पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करतात.

नसांमध्ये बिघाड झाला तर

या नसांमध्ये बिघाड झाला तर हालचाल, स्मरणशक्ती, समतोल, वेदना जाणवण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी प्रभावित होतात. यावेळी शरीरात कोणते बदल होतात ते जाणून घेऊया.

हातापायांत मुंग्या येणं किंवा सुन्नपणा

नसा कमजोर झाल्यास हात-पाय लवकर सुन्न पडू लागतात. थोडंसं काम जरी केलं तरी मुंग्या येण्याची समस्या वाढते. काही वेळा हातपाय गरम-थंडपणाची जाणीवही कमी होते.

चालण्यात समस्या

नसांवर परिणाम झाल्यावर शरीराचा समतोल नीट राखता येत नाही. चालताना वारंवार तोल जातोय असं दिसून येतं. जिने चढणं-उतरणंही कठीण होऊ शकतं.

स्मरणशक्ती

मेंदूच्या नसांवर ताण आल्यास आठवण ठेवणं अवघड होऊ लागतं. छोटी-छोटी कामं विसरणं किंवा लक्ष एकाग्र न होणं वाढतं. विचार करण्याची गतीही मंदावते.

बोलण्यात अडथळे येणं

नसांची क्षमता कमी झाल्यावर बोलताना शब्द अडखळतात. वाक्यं नीट उच्चारता येत नाहीत किंवा बोलणं संथ होतं. इतरांना आपलं बोलणं समजायला अवघड जातं.

थकवा

नसा कमजोर असतील तर शरीर पटकन दमायला लागतं. पुरेशी झोप घेतली तरी दिवसभर अंगात ताकद जाणवत नाही. सतत सुस्ती किंवा जडपणा जाणवतो.

वेदना

नसांमध्ये सूज किंवा कमकुवतपणा आल्यास पाठीमध्ये, मानेत किंवा पायांत झणझणीत वेदना जाणवतात. या वेदना अचानक वाढतात आणि दैनंदिन कामांवर परिणाम करतात.

सिमेंट नसतानाही कसा बांधला गेला इतका मजबूत ताजमहाल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा