ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव:
ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराचे संसर्गाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जात आहे.
बूस्टर डोस-
कोरोनापासून बचाव करण्यासाठी Front Line Workers तसेच 60 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लोकांना कोविड-19 लसीचा बूस्टर डोस दिला जात आहे.
बूस्टर डोस घेण्याचा फायदा काय ?
संशोधनाच्या आधारे, तज्ञ म्हणतात की बूस्टर डोसमुळे शरीरात अँटीबॉडीजची पातळी वाढते. बूस्टर डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्तीसुद्धा पूर्वीपेक्षा मजबूत होते.
कोणाला मिळणार बूस्टर डोस?
सध्या, हा डोस केवळ आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइन कामगार आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजार असलेल्या लोकांना बूस्टर शॉट म्हणून दिला जाईल.
कोणत्या लसीचा बूस्टर डोस मिळणार?
तुम्हाला त्याच लसीचा बूस्टर डोस दिला जाईल ज्यासाठी दोन्ही डोस दिले गेले आहेत.
बूस्टर डोस घेण्याची पात्रता?
बूस्टर डोस फक्त 39 आठवड्यांनंतर म्हणजेच कोविड लसीच्या दुसऱ्या डोसच्या 9 महिन्यांनंतर दिला जाईल.
वृद्धांसाठी बूस्टर डोस:
बूस्टर डोस फक्त 60 वर्षांवरील वृद्ध लोक ज्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, किडनी रोग, कर्करोग इत्यादी गंभीर आजार आहेत त्यांना बूस्टर डोस घेता येऊ शकणार आहे.
बूस्टर डोससाठी रजिस्ट्रेशन-
बूस्टर डोसची नोंदणी ऑनलाइन आणि साइटवर केली जात आहे. तुम्ही थेट लसीकरण केंद्राला भेट देऊनही नोंदणी करू शकता.
बूस्टर डोस घेणे सुरक्षित आहे का?
भारत बायोटेक या कोवॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या कंपनीने केलेल्या चाचण्या तसेच कोवॅक्सिन नंतर बूस्टर डोस घेणे सुरक्षित असल्याचे सूचित करतात.
नोट:
तज्ञांच्या मते, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या वृद्धांनी बूस्टर डोस घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.