ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोफिया अन्सारी एक अतिशय लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आणि टिकटॉकर म्हणून ओळखली जाते. २०२० मध्ये भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर सोफिया इंस्टाग्रामवर प्रसिद्ध झाली.
सोफिया प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे शॉर्ट व्हिडिओ शेअर करते. यामुळे ती लोकप्रिय आहे.
ती शॉर्ट व्हिडीओ, रील्स बनवते. तिचे एक्सप्रेशन्स आणि डान्स नेटीझन्सना खिळवून ठेवतो.
सोफियाचा कंटेंट शॉर्ट असला तरी त्याला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळतात, त्यामुळे इन्स्टाग्रामवर ती लोकप्रिय झाली आहे.
सोफिया तिच्या बोल्डनेसमुळे जेवढी लोकप्रिय आहे, तेवढंच तिला ट्रोलही करण्यात येतं. पण तरीही आज इन्स्टाग्रामवर तिचे ९.१ मिलियन म्हणजेच ९१ लाख फॉलोवर्स आहेत.
सोफियाच्या अतिशय बोल्ड कंटेंटमुळे तिचं इन्स्टाग्राम अकाउंट इन्स्टाग्रामकडूनच बॅन करण्यात आलं होतं, मात्र आता ते पुन्हा सुरु करण्यात आलं आहे.
सोफिया २५ वर्षांची असून ती पश्चिम बंगालची आहे.
२०२१ मध्ये सोफियाने बिल्लो टाउन गाण्यात काम केलं, आणि तिला यश मिळालं. या गाण्याने लाखो व्ह्यूज मिळवले. त्याच वर्षी तिचं दुसरं पंजाबी गाणं 'चष्मा प्यार का' रिलीज झालं होतं.
सोफिया एक जिमहोलिक व्यक्ती आहे आणि तिला फिट आणि सुंदर राहण्यासाठी योग्य आहार आणि व्यायामाचे करण्याचीही आवड आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.