Amit Golwalkar
पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काईव्हने २०२२ या वर्षीची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले हुतात्म्यांचे योगदान रुपेरी पडद्यावर कसे उमटले याची माहिती या दिनदर्शिकेत आहे
१९५३ साली प्रदर्शित झालेल्या झाँसी की रानी या हिंदी चित्रपटात अभिनेत्री मेहताब यांनी झाशीच्या राणीची भूमीका साकारली होती
१९६० मध्ये उमाजी नाईक हा चित्रपट प्रदर्शित झाला. गजानन जहागिरदार यांनी उमाजी नाईक यांची भूमीका केली होती
स्वातंत्र्यवीर कादर बक्ष उर्फ कादू मकरानी यांच्या जीवनावर कादू मकरानी हा गुजराती चित्रपट प्रदर्शित झाला. त्यालाही या कॅलेंडरवर स्थान मिळाले आहे
१९९९ मध्ये शहिद उधमसिंग चित्रपटात अभिनेते राज बब्बर यांची भूमीका होती. सरदार उधमसिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असलेल्या जनरल डायरला यमसदनाला पाठविले होते.
स्वातंत्र्याच्या पहिला लढा छेडणारे मंगल पांडे यांच्या जीवनावर 'मंगल पांडे - द रायझिंग' हा चित्रपट आमीर खान यांनी २००५ मध्ये प्रदर्शित केला. NFAI च्या कॅलेंडरमध्ये या चित्रपटाला स्थान देण्यात आले आहे.
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावरील चित्रपटात अभिनेते अजिंक्य देव यांनी भूमीका केली होती. NFAI ने कॅलेंडरमध्ये या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित केले आहे. या व्यतिरिक्त आणखी काही चित्रपटांची पोस्टरही या कॅलेंडरमध्ये आहेत. NFAI च्या अधिकृत वेबसाईटवर हे कॅलेंडर PDF स्वरुपात उपलब्ध आहे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.