ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अमरावतीतील एका गरीब कुटुंबात नेहा खानचा जन्म झाला. तिची आई मराठी तर वडिल मुस्लिम होते. नेहाची आई ही नेहाच्या वडिलांची तिसरी पत्नी होती.
नेहाने मुंबईत येऊन खूप स्ट्रगल केलं. शिकारी,बॅड गर्ल, काळे धंदे (वेब सिरीज), हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स सारख्या चित्रपटांत नेहा खाननं यापूर्वी काम केलं आहे.
शिकारी या मराठी चित्रपटात तिने अनेक बोल्ड सीन्स दिले. हा चित्रपट फ्लॉप गेला पण नेहाची भूमिका कुणी विसरु शकलं नाही.
नेहाने अनेक चित्रपटांत काम केलं असलं तरी 'देवमाणूस' मालिकेमुळे ती घराघरांत पोहचली आणि खऱ्या अर्थानं तिला ओळख मिळाली.
बालपणी शेजारच्या एक काकू नेहाला फोटो स्टुडिओमध्ये घेऊन गेल्या आणि फोटोग्राफरला तिचे फोटो इतके आवडले की, त्यानं तिचे फोटो पेपरमध्ये देण्यासाठी परवानगी मागितली. त्यानंतर खऱ्या अर्थानं तिची याक्षेत्राकडे वाटचाल सुरू झाली, असं नेहा सांगते.
नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू' मध्ये काम केलं आहे.
याशिवाय नेहाने 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.
सोबतच नेहा शाहरुख खानसोबत एका जाहिरातीत देखील झळकली आहे. 'युवा' या हिंदी चित्रपटात तिने जिम्मी शेरगिलसोबत काम केलं आहे.
नेहा सोशल मीडियावर खासकरुन इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. Instagram वर तिचे ३ लाख फॉलोअर्स पुर्ण व्हायला अजून केवळ ४६ फॉलोअर्स हवे आहेत.
नेहा खान जेवढी बोल्ड आणि हॉट आहे तेवढीच सुंदर आणि प्रेमळ आहे. गरिबीतून आल्याने तिला परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे चाहते तिच्यावर भरभरुन प्रेम ओवाळतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.