पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाणं टाळावं, नाहीतर होईल फूड पॉयझनिंग

Bharat Jadhav

कोणत्या भाज्या खाऊ नये

पावसाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या काळात भाज्यांच्या संपर्कात जिवाणू (बॅक्टेरिया) आल्यास, त्यांचे सेवन केल्याने संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच, पावसाळ्यात काही विशिष्ट भाज्या खाणे टाळाव्यात.

फ्लॉवर आणि कोबी

पावसाळ्यात फ्लॉवर आणि कोबी खाणे टाळावे. या भाज्यांच्या थरांमध्ये किंवा फ्लॉवरच्या तुऱ्यांमध्ये बुरशी सहजपणे अडकू शकते.

मशरूम

मशरूममध्ये किंचितही भेसळ असेल आणि ते खाल्लं तर अन्न विषबाधेचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात मशरूम खाणे कटाक्षाने टाळावे.

पालक

पावसाळ्यात, पालक नीट धुतल्यानंतरही त्यात सूक्ष्मजीव शिल्लक राहतात. या सूक्ष्मजीवांमुळे पचनसंस्थेचे संसर्ग (माइक्रोब्स गट इंफेक्शन) होऊ शकते.

कोथिंबीर आणि पुदिना

पावसाळ्यात कोथिंबीर आणि पुदिना यांसारख्या पालेदार वनस्पतींचे सेवनदेखील कमी केलं पाहिजे. या वनस्पती जमिनीलगत वाढत असल्याने, पावसाळ्यात त्या मातीतील बॅक्टेरियामुळे दूषित होऊ शकतात.

कमी पाण्याचे प्रमाण असलेल्या भाज्या खा

पावसाळ्यात कमी पाण्याचे प्रमाण असलेल्या भाज्या खाणे चांगले असते. या काळात तुम्ही दुधी भोपळा, पडवळ, फरसबी (बीन्स), भोपळा आणि मका यांसारख्या भाज्यांचे सेवन करू शकता.

मसूर आणि राजमा उत्तम

पावसाळ्यात मसूर, राजमा आणि काबुली चणे खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. यांचे सेवन केल्याने प्रथिनांची कमतरता टाळता येते आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली राखण्यास मदत होते.

टीप

हे वृत्त केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी, कृपया तज्ञांचा सल्ला घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा

येथे क्लिक करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devgiri Fort: ७५० पायऱ्या अन् मगरींचा पहारा; महाराष्ट्रातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे हा किल्ला