'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूनं घटवलं वजन, नवा लुक पाहून व्हाल थक्क!

नरेश शेंडे

जगातील सौंदर्य स्पर्धांमधील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा यंदाचा मिस युनिव्हर्स २०२१ चा किताब पंजाबी गर्ल हरनाज संधूने जिंकला आहे.सोशल मीडियावर हरनाज नेहमीच सक्रिय राहून तिचे सुंदर फोटो शेयर करते.

Harnaaz Kaur Sandhu | Instagram/HarnaazSandhu_03

मिस युनिवर्स जिंकल्यानंतर हरनाज संधूचं वजन वाढल्यावर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. नेटकऱ्यांनी केलेल्या टीका-टीप्पणीला हरनाजने फारसं मनावर घेतलं नाही. ट्रोलिंगला सकारात्मक दृष्टीने घेवून नेटकऱ्यांना हरनाजने जशाच तसं उत्तर दिलं.

Harnaaz Kaur Sandhu | Instagram/HarnaazSandhu_03

'Celiac'आजारामुळे हरनाज संधूचं वजन वाढलं होतं.मात्र, हरनाजने आता जबरदस्त बॉडी ट्रांसफॉर्मेशन केल्यानं तिच्या नव्या लुकला पाहून सर्वच अवाक झाले आहेत. हरनाजने पुन्हा एकदा वजन कमी केल्यानं तिचं सोंदर्य आणखी खुललं आहे.

Harnaaz Kaur Sandhu | Instagram/HarnaazSandhu_03

मिस युनिवर्स २०२१ चा किताब तब्बल २१ वर्षांनी भारताला मिळाला.२१ वर्षीय हरनाज मूळची पंजाबची आहे.

Harnaaz Kaur Sandhu | Instagram/HarnaazSandhu_03

मार्च महिन्यात हरनाजचे वजन वाढलेल्या लुकचे फोटो समोर आले होते. पण आता मे महिन्यात हरनाज संधू पुन्हा एकदा स्लिम फिट लुकमध्ये समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Harnaaz Kaur Sandhu | Instagram/HarnaazSandhu_03