Parenting Tips: मुलीला शिक्षणासोबत 'ही' ७ जीवनकौशल्ये नक्की शिकवा; भविष्यात ठरतील फायदेशीर

Shruti Vilas Kadam

आत्मविश्वास वाढवा

मुलीला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवा. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे मत आत्मविश्वासाने मांडण्याची सवय लावा.

mother and daughter | canva

स्वतःचा सन्मान करायला शिकवा

स्वतःच्या भावना, मतं आणि निर्णयांचा आदर करणे किती महत्त्वाचे आहे, हे तिला समजावून सांगा.

mother daughter

आर्थिक शहाणपण शिकवा

पैशांचे महत्त्व, बचत, खर्चाचे नियोजन आणि आर्थिक स्वावलंबन याबद्दल लहानपणापासूनच योग्य माहिती द्या.

mother daughter | saam tv

डिजिटल सुरक्षिततेची जाणीव द्या

सोशल मीडिया, ऑनलाइन फसवणूक, पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत मुलीला जागरूक करा.

Mother-daughter | Google

योग्य प्रश्न विचारण्याची सवय लावा

कोणतीही गोष्ट समजली नाही तर प्रश्न विचारण्यास घाबरू नये, तसेच चुकीची माहिती सहज स्वीकारू नये, हे तिला शिकवा.

Emotional bonding

स्वतःचे निर्णय घेण्यास प्रोत्साहन द्या

वयानुसार योग्य निर्णय स्वतः घेण्याची संधी द्या. चुकांमधून शिकण्याची आणि समस्यांवर उपाय शोधण्याची सवय लावा.

mother daughter | Saam Tv

मोठी स्वप्नं पाहण्याची हिंमत द्या

मुलीच्या आवडी आणि ध्येयांना प्रोत्साहन द्या. तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवून मोठी स्वप्नं पाहण्यासाठी तिला कायम प्रेरित करा.

mother daughter | Yandex

Hair Care: दाट, लांबसडक केस हवेत? मग आजपासूनच आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care | Saam tv
येथे क्लिक करा