Shruti Vilas Kadam
लस्सी बनवण्यासाठी २ कप ताजे दही, ३ ते ४ चमचे साखर, अर्धा कप थंड पाणी किंवा दूध, २ वेलची आणि काही बर्फाचे तुकडे घ्या.
सर्वप्रथम एका भांड्यात ताजे आणि घट्ट दही घ्या. रवी किंवा व्हिस्कच्या मदतीने दही चांगले फेटून घ्या. दही गुळगुळीत झाल्यावर लस्सी अधिक क्रीमी लागते.
फेटलेल्या दह्यामध्ये साखर आणि वेलची पावडर घाला. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
आता दह्यामध्ये थंड पाणी किंवा दूध घाला. लस्सी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे, त्यानुसार पाण्याचे प्रमाण ठरवा. पुन्हा एकदा चांगले फेटून घ्या.
लस्सी अधिक फेसाळ आणि क्रीमी हवी असल्यास ती रवीने किंवा ब्लेंडरमध्ये काही सेकंद फेटा. यामुळे लस्सीला छान टेक्सचर मिळते.
तयार लस्सी ग्लासमध्ये ओता आणि त्यात काही बर्फाचे तुकडे घाला. वरून वेलची पावडर किंवा केशर घालून लस्सी सजवू शकता.
लस्सीला रिच आणि रेस्टॉरंटसारखा स्वाद देण्यासाठी वरून बदाम, पिस्ता किंवा काजूचे काप घाला. गोड लस्सीसोबत तुम्ही मँगो लस्सी किंवा गुलाब लस्सीही ट्राय करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.