Surabhi Jagdish
मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णाने त्याच्या आहाराकडे लक्ष देणं आवश्यक असते.
असं न केल्यास रुग्णाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
मात्र प्रश्न असा आहे की, मधुमेहाच्या रुग्णांनी दूध प्यावे की नाही.
तज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी मर्यादित प्रमाणात दूध प्यावे.
पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुधात सायीचं प्रमाण नसावं.
जर तुम्ही मधुमेहामध्ये दूध सेवन करत असाल तर ते टोन्ड किंवा गायीचे दूध असल्याची खात्री करा.
मधुमेहामध्ये झोपण्याच्या १, २ तास आधी तुम्ही दूध पिऊ शकता. लक्षात ठेवा की एक ग्लासपेक्षा जास्त दूध पिऊ नका.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.