IPL 2022: 'हिरो' एका रात्रीत झाले 'झिरो'

साम टिव्ही ब्युरो

हार्दिक पांड्या

पांड्याने जेव्हापासून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे, तेव्हापासून तो मुंबई इंडियन्सचा भाग आहे. परंतु २०२२ च्या हंगामात पांड्या मुंबईचा भाग नसणार आहे.

फाफ ड्यू प्लेसीस

प्लेसीसला चेन्नईच्या संघाने या हंगामात रिटेन केले नाही. प्लेसीसने मागच्या हंगामात चेन्नईच्या वतीने बऱ्याच धावा केल्या होत्या तरीही त्याला संघाने वगळले आहे.

हर्षल पटेल

हर्षल पटेलने मागच्या हंगामात आरसीबीच्या वतीने आणि संपुर्ण आयपीएलमध्ये सर्वाधीक विकेट घेतल्या होत्या, तरीही आरसीबीने त्याला रिटेन केले नाही.

केएल राहूल

केएल राहूल पंजाब किंग्सच्या संघाने वगळले आहे. मागच्या हंगामात राहूल सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत प्रथम पाच फलंदाजांमध्ये होता.

डेविड वॉर्नर आणि राशिद खान

दोघांनाही संघाने वगळले आहे. डेविड वॉर्नरने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात आपल्या फलंदाजीची चमक दाखवली आहे. तसेच राशिद खानने स्वत: हैद्राबादकडून न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान प्रमुख गोलांदाज म्हणून ज्याने भुमिका बजावली त्याला राजस्थानने रिटेन केले नाही. राजस्थानने संजू सॅमसनला १४ कोटी रुपयात रिटेन केले आहे.

दक्षिण आप्रिकेचा वेगवान गोलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्स खेळणाऱ्या दिग्गज गोलंदाजाला दिल्लीने वगळले आहे. दिल्लीच्या संघ व्यवस्थापनाने एनरिक नॉर्टजे वरती आपला विश्वास दाखवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.