HPV विषाणूमुळे होऊ शकतो घशाचा कॅन्सर; रुग्णांमध्ये कोणती लक्षणे दिसतात

Bharat Jadhav

HPV

ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' (HPV) हे नाव ऐकताच लोकांच्या डोक्यात 'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग' (cervical cancer) हा विचार येतो. मात्र, हा विषाणू घशाच्या कर्करोगाचे काही प्रकारही निर्माण करू शकतो.

ओरोफॅरिंजियल

हा विषाणू कर्करोगाचे विशेष करून 'ओरोफॅरिंजियल' (तोंड आणि घशाच्या भागातील) कर्करोगाचे मुख्य कारण ठरू शकतो. हा कर्करोग टॉन्सिल्स आणि जिभेच्या मुळावर परिणाम करतो.

कर्करोगास कारणीभूत

HPV हा जगातील सर्वात सामान्य विषाणूजन्य संसर्गांपैकी एक आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, शरीराची रोगप्रतिकारशक्ती हा संसर्ग स्वतःहून दूर करते; मात्र, काही लोकांमध्ये HPV विषाणू दीर्घकाळ टिकून राहतो आणि कालांतराने कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो.

तंबाखू न खाणाऱ्यांही होतो कॅन्सर

अनेक देशांमध्ये एचपीव्ही (HPV) आता तोंड-घशाच्या कर्करोगाचे एक प्रमुख कारण बनले आहे. हा कर्करोग तंबाखू किंवा दारूचे सेवन न करणाऱ्या तरुण लोकांनाही होतोय. भारतातही एचपीव्ही-संबंधित घशाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.

आजार ओळखता का येत नाही?

दिल्लीतील डॉ. अक्षत मलिक (वरिष्ठ सल्लागार, हेड अँड नेक ऑन्कोलॉजी, अपोलो हॉस्पिटल,) यांनी सांगितले की, याची सुरुवातीची लक्षणे सामान्य वाटतात, त्यामुळेच लोक हा आजार ओळखू शकत नाहीत आणि त्याकडे दुर्लक्ष होतं.

या लक्षणांकडे नका करू दुर्लक्ष

जर तुम्हाला सतत घसा दुखणे, गिळण्यास त्रास होणे, मानेवर गाठ येणे, आवाजात बदल होणे किंवा घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे यांसारखी लक्षणे जाणवली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

HPV लस अत्यंत महत्त्वाची

HPV लसीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. ही लस HPV-संबंधित कर्करोगास प्रामुख्याने कारणीभूत ठरणाऱ्या, उच्च-धोकादायक (high-risk) HPV प्रकारांपासून संरक्षण देते. ही लस मुलांना आणि मुलींनाही दिली जाते. ९ ते १४ वयोगटात ही लस दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.