Shivani Tichkule
कोलकाता येथील एक लग्न संपूर्ण देशाच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हे लग्न समलिंगी जोडप्यामुळे खूप चर्चेत आहे.
फॅशन डिझायनर अभिषेक रे यांनी त्यांचा जोडीदार चैतन्य शर्माशी धूमधडाक्यात लग्न केलं.
3 जुलै रोजी या दोघांनी लग्न गाठ बांधली.
अभिषेक रे आणि चैतन्य शर्मा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या लग्न समारंभात अभिषेकने पारंपारिक बंगाली नवरदेवाची वेशभूषा निवडली तर चैतन्यने शेरवानी घातली होती.
या विवाहामुळे LGBTQ+ समुदाय हा समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
समलैंगिक विवाह होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हैदराबादमध्ये एका समलिंगी जोडप्याने लग्नगाठ बांधली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.