ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध असे स्ट्रीट फूड वडापाव. जो तळलेल्या मिरची सोबत व खोबऱ्याच्या चटणीसोबत खाल्ला जातो.
झणझणीत मिसळ हे मुंबईतील आणखी एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. यात बटाटा, मटकी, कांदा, चिवडा व टोमॅटो घालून याची चव चाखली जाते.
पाव भाजी ही सगळ्यात फेमस स्ट्रीट फूड असून यात विविध प्रकारच्या भाज्या घातल्यात जातात. त्यात वरून मस्त बटर, चिरलेला कांदा व लिंबू पिळून पावासोबत सर्व्ह केले जाते.
स्ट्रीटफूड मधली सगळ्यात पसंतीची असणारी भेलपुरी अनेक ठिकाणी खायला मिळते. ही कुरमुरे, डाळ, कांदा, टोमॅटो, चणे-शेंगदाणे, तिखट-गोड चटणी व शेव घालून बनवली जाते.
रगडा पॅटिस हा आलू टिक्की घालून बनवला जातो. यात वाटणे, चटणी, शेव, कांदा व अनेक मसाले घालून दिली जाते. स्ट्रीट फूडमध्ये या डिशला अधिक पसंती मिळते
बटाटा पुरी ही स्ट्रीट फूडमधले लोकप्रिय पदार्थ आहे. पुरीमध्ये कुस्करलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, मिरची व चटणी घालून खाल्ली जाते. याची चव आंबट-गोड लागते.
मुंबईतील स्ट्रीट फूडमध्ये बटाटा वडा हा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ कुस्करलेले बटाटे, मसाले घालून वरून बेसन लावून फ्राय केला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.