Satish Daud-Patil
इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.
बटलरने नेदरलँड्सविरुद्धच्या वनडे मालिकेतही आपला आयपीएल फॉर्म कायम ठेवला
बटलरने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा १७ वर्षे जुना विक्रम मोडला.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत जोस बटलरने एकूण १९ षटकार ठोकले.
महेंद्रसिंग धोनीने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 17 षटकार मारले होते.
मात्र बटलरने आता तीन सामन्यात तब्बल 19 षटकार ठोकून हा विक्रम मोडला.
बटलरने नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 162 धावांची खेळी केली.
बटलरने या मालिकेत 185 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने एकूण 248 धावा केल्या.
या मालिकेत बटलरला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून गौरवण्यात आले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.