Akshay Baisane | अक्षय बैसाणे
मानुषी छिल्लर ६ वी भारतीय मिस वर्ल्ड आहे. तिच्या सुंदरतेमुळे तिचे लाखो चाहते आहेत.
मानुषीने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अक्षय कुमारसोबत तिने सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत एन्ट्री केली आहे.
डॉक्टर होण्याचं स्वप्नं पाहिलेली मानुषी ब्युटी रँपवर उतरली आणि मिस वर्ल्डचा किताब पटकावला. मानुषीने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
१४ मे १९९७ ला हरियाणातील हिसार या गावी मानुषीचा जन्म झाला. दिल्लीच्या सेंट थॉमस स्कूलमधून तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं.
मानुषीच्या घरी पूर्णपणे शैक्षणिक वातावरण असल्याने मानुषीही शालेय वयात खूप हुशार होती. मानुषीचे वडील डॉ. बासू छिल्लर हे एम. डी. आहेत तर आई मंजू छिल्लर बायोकेमिस्ट्रीच्या डॉक्टर आहेत.
सोनीपतच्या भगत फूलसिंह सरकारी मेडिकल कॉलेजमधून मानुषीने एमबीबीएसचं शिक्षण घेतलं. मानुषी कार्डियाक सर्जनचं वैद्यकीय शिक्षण घेत होती.
याव्यतिरिक्त मानुषीने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचेही धडे गिरवले आहेत. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मानुषीने वैद्यकिय क्षेत्राऐवजी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
मानुषीला सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची इच्छा होती, त्यासाठी तिने २०१६ पासूनच तयारी सुरू केली. कॉलेज कॅम्पसमधील एका ब्युटी कॉन्स्टेस्टमधून मानुषीला आत्मविश्वास आला.
मानुषी तिच्या बोल्ड लुक्स आणि ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून मानुषीचे फोटो तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
मानुषीचे इन्स्टाग्रामवर ६ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तिच्या मनमोहक फोटोंवर चाहते भरभरुन प्रेम देतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.