Surabhi Jayashree Jagdish
जेव्हा शरीरात युरिक अॅसिड वाढते, तेव्हा बहुतांश वेळा सांधेदुखी आणि संधिवात यासारख्या समस्या निर्माण होतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येऊ शकतो?
जर हे तुम्हाला माहीत नसेल, तर लक्षात ठेवा की जेव्हा युरिक अॅसिड दीर्घकाळ जास्त प्रमाणात राहतं, तेव्हा त्वचेवर विविध प्रकारची लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं शरीरात सुरू असलेल्या अंतर्गत बदलांचे संकेत देतात.
ही लक्षणे तुम्हाला वेळेत हायपरयुरिसीमिया म्हणजेच युरिक अॅसिड वाढल्याची जाणीव करून देऊ शकतात. यामुळे ही समस्या गंभीर आजार होण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घेता येतो.
जर युरिक अॅसिड दीर्घकाळ जास्त प्रमाणात राहिले, तर त्वचेखाली गाठी तयार होऊ शकतात, ज्यांना टोफी म्हणतात. या गाठी युरिक अॅसिडचे स्फटिक जमा झाल्यामुळे तयार होतात.
संधिवाताच्या झटक्याच्या वेळी कोणत्याही सांध्यावरची त्वचा लालसर किंवा जांभळट दिसू शकते. ही लक्षणे युरिक अॅसिड वाढल्याचे स्पष्ट संकेत देतात.
त्वचा काळसर होणं हे काही वेळा सांध्यांच्या आजूबाजूच्या त्वचेचा रंग गडद होण्याचं लक्षण असतं. युरिक अॅसिड दीर्घकाळ जास्त राहिल्यामुळे किंवा सूजेमुळे हायपरपिग्मेंटेशन होऊ शकतं.
गाऊट अटॅकनंतर प्रभावित झालेल्या सांध्यांवरील त्वचा सोलल्यासारखी दिसू शकते, जशी उन्हामुळे त्वचा सोलते. हे बरे होण्याचे लक्षण असले तरी युरिक अॅसिड जास्त असताना त्वचेवर ताण पडल्याचे हे संकेत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.