Constipation: सकाळी पोट साफ होत नाही? मग रात्रीच्या खाण्यात करा हा बदल; 1 मिनिटांत पोट होईल साफ

Sakshi Sunil Jadhav

पोटाच्या समस्या

सध्याच्या बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही. त्यामुळे दिवसभर अस्वस्थता, गॅस, अॅसिडिटी आणि मूड खराब, बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

constipation relief tips

सोप्या टिप्स

तुम्हाला यासाठी टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही रात्रीच्या जेवणात काही सोपे बदल करुन ही समस्या सहजपणे दूर करू शकता.

digestion improvement

हलक्या पदार्थांचे सेवन

रात्री जड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळा. खिचडी, भाज्या किंवा सूपसारखे हलके पदार्थ खाल्यामुळे पचनाला पुरेसा वेळ मिळतो.

night diet for digestion

फायबरयुक्त आहार

पालक, मेथी, गाजर, बीट यांसारख्या भाज्या आणि सॅलड रोज जेवणात खा. याने तुमचं पचन सुधारेल.

night diet for digestion

कोमट पाणी पिणे

रोज रात्री झोपताना कोमट पाणी प्या. याने पचनक्रिया सुधारते आणि सकाळी पोट साफ होतं.

healthy digestion tips

दही किंवा ताक घ्या

रोज रात्री झोपण्याच्या तासभर आधी दही किंवा ताका घ्या. त्यातले प्रोबायोटिक्स पोटासाठी फायदेशीर असतात.

stomach cleansing tips

साखर आणि जंक फूड

रात्री गोड पदार्थ, फास्ट फूड किंवा प्रोसेस्ड फूड खाणं सोडा. लक्षात ठेवा उशिरा जेवल्यावर पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे लवकर जेवा. पपई, केळी किंवा सफरचंद रात्री खाल्ल्यावर पचन सुधारतं.

stomach cleansing tips

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

morning constipation

NEXT: Morning Skincare Routine: चेहरा दिसेल दिवसभर टवटवीत, सकाळी उठल्यावर करा हे रुटीन फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

fresh face all day
येथे क्लिक करा