बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी; नेते मंडळी जाम खुश !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेची आज सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली. बैलगाडा शर्यतीत सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे.

मागील अनेक दिवसांपासून बैलगाडी शर्यती बंद होत्या, अनेक दिवसांपासून न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित होतं अत्यंत चांगले वकिल आम्ही न्यायालयात बाजू मांडणासाठी नेमलेले होते. हा मोठा दिलासा आहे. काही अटी व शर्ती या पूर्वीच देण्यात आलेल्या आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणले आहेत.

दिलीप वळसे पाटील

आमच्या सरकारने सादर केलेला अहवाल सुप्रीम कोर्टाने स्विकारला, याचा मला आनंद अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये.

देवेंद्र फडणवीस

बैलगाडा मालकांसाठी आनंदाचा दिवस आहे. ज्या दिवसाची आपण गेले कित्येक दिवसापासून वाट पाहत होतो. शर्यतीवर जो निर्बंध घालण्यात आले होते ते आज उठवण्यात आले आहेत. अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे.

निलेश लंके

आता देशात एक न्याय आणि महाराष्ट्रात एक न्याय ही परिस्थिती दूरावली आहे अशी भावना पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सर्वाेच्च न्यायालयाने (supreme court) बैलगाडा शर्यतींच्या बाबतीत दिलेल्या निकालाबाबत व्यक्त केली.

सुनील केदार

अर्धी लढाई जिंकलो आणि सर्वोच न्यायालयाचे मी मानतो अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

अमोल कोल्हे

"बैलगाडा शर्यतीचा निर्णय ग्रामीण महाराष्ट्रासाठी महत्वाचा" अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार

गाेपीचंद पडळकर म्हणाले राज्यातील शेतक-यांसह बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. न्यायालयात निर्णय झाला तरच राज्यात चांगलं हाेत आहे हे आज पुन्हा सिद्ध झालं आहे. महाराष्ट्रातील सरकार काहीच करीत नाही हे आज सिद्ध झालं.

गाेपीचंद पडळकर

बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिल्याच्या निर्णयाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं.

चंद्रकांत पाटील

7 वर्ष ज्या निर्णयाची वाट बघत होते तो निर्णय कानावर आला, कानावर विश्वास बसत नाहीये असं मत आढळराव पाटलांनी व्यक्त केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आढळराव