Surabhi Jagdish
दिवाळी सुरू झाली असून दिवाळीत काही शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे वाचा.
तुम्ही दिवाळीला हे स्टॉक खरेदी करू शकता, यामुळे तुम्हाला पुढील दिवाळीपर्यंत चांगला परतावा मिळू शकतो.
HDFC सिक्युरिटीजने ॲक्सिस बँक लिमिटेड, कॅन फिन होम्स लिमिटेड, करूर वैश्य बँक लिमिटेड आणि स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड या चार शेअर्सची नावं यामध्ये आहेत. साप्ताहिक तांत्रिक चार्टवर हे शेअर्स मजबूत दिसतायत.
मुहूर्त ट्रेडिंग शुक्रवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत होणार आहे. तर प्री-ओपनिंग संध्याकाळी 5:45 ते 6 या वेळेत होईल.
एचडीएफसी सिक्युरिटीजने सांगितलंय की, 1,124 रुपयांच्या डबल बॉटम सपोर्टवर एक बुलिश कँडल तयार होते.
ब्रोकरेजने सांगितलंय की, ॲक्सिस बँकेची टारगेट प्राईज रुपये 1,332 आणि रुपये 1,403 असणार आहे.
तर करूर वैश्य बँकेने 214-218 रुपयांची टारगेट प्राईज आणि 249 रुपयांचे टारगेट ठेवलंय. स्टाइलम इंडस्ट्रीजसाठी लक्ष्य किंमत 2,560-2,690 रुपये आहे.
ब्रोकरेजने कॅन फिन होम्स रु. 850-860 च्या खरेदी करण्याचा सल्ला दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.