Sakshi Sunil Jadhav
आज नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील वाद मिटतील आणि विवाह प्रस्तावामुळे आनंदाचे वातावरण राहील.
साहस आणि आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर होतील, मात्र वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
आर्थिक लाभाचे योग आहेत, गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. मात्र विरोधकांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कुटुंबीयांशी संवाद ठेवल्यास गैरसमज दूर होतील.
कौटुंबिक नातेसंबंध मजबूत होतील, पण खर्च वाढू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या आणि अनावश्यक वाद टाळा.
उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. कामात यश मिळेल, मात्र बाहेरचे खाणे टाळा.
व्यवसायात भागीदारीतून फायदा होईल. कायदेशीर प्रकरणांत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
भाग्याची साथ लाभेल आणि अडथळे दूर होतील. प्रवासाचे योग असून कौटुंबिक आनंद मिळेल.
गुंतवणूक करताना काळजी घ्या. आरोग्यात चढ-उतार राहतील, रागावर नियंत्रण ठेवा.
नोकरीतील मतभेद दूर होतील. नवीन संधी मिळू शकते आणि प्रेमसंबंधांना सकारात्मक दिशा मिळेल.
वाणी आणि वर्तनावर संयम ठेवा. कौटुंबिक विषयांवर संवाद आवश्यक ठरेल.
विद्यार्थ्यांसाठी यशाचा दिवस आहे. अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असून आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.