Surabhi Jagdish
वास्तू शास्त्राचे काही खास नियम असतात. या नियमांचं पालन केल्यास सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे अट्रॅक्ट होते. वास्तू शास्त्र तुम्हाला काही धातू परिधान करण्याबाबतंही माहिती देतं.
वास्तू शास्त्रामध्ये सोन्याला संपत्ती, समृद्धी मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्व दिलं जातं. याशिवाय सकारात्मक ऊर्जा वाढवतं.
चांदी भावनिक संतुलन आणि मानसिक शांततेशी संबंधित असतं, असं वास्तू शास्त्र मानतं. चांदीचे दागिने वापरल्याने तणाव कमी होतो. त्याचप्रमाणे निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
तांबे हे चांगलं आरोग्य, चैतन्य आणि वाढीव उर्जेशी जोडलेलं आहे. वास्तूमध्ये ती सकारात्मक ऊर्जेचा वाहक मानली जाते. त्यामुळे तांब्याच्या वस्तू वापरण्याचा सल्ला दिला जातो.
पितळ हे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणतं. वास्तू शास्त्रानुसार, कलात्मक भूमिका असलेल्या व्यक्तींसाठी पितळ परिधान करणं फायदेशीर ठरू शकते.
प्लॅटिनम परिधान केल्याने लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. त्यामुळे याचे दागिने परिधान करण्याचा सल्ला दिला जातो.
लोहामुळे नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे दूर होण्यास मदत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.