हाताची कोपरं काळीकुट्टं झालीयेत? घराच्या घरी 'या' टीप्सने करा काळेपणा दूर

Surabhi Jagdish

कोपर आणि गुडघे काळे पडलेत का? काहीही केल्या हा काळेपणा दूर होत नाहीये? जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर या घरगुती उपायांनी तुम्ही या यावर सहज मात करू शकता.

दही आणि हळद

दही आणि हळद दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत. दही त्वचेला मॉइश्चरायज करतं आणि हळद एंटीसेप्टिक गुणधर्मांनी समृद्ध असते.

कृती

दही आणि हळद एकत्र करून पेस्ट बनवा आणि कोपर आणि गुडघ्यावर लावा. 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

बेसन आणि दही

बेसन हे नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे जे डेड स्किन काढून टाकण्यास मदत करते.

कृती

बेसन आणि दही एकत्र करून पेस्ट बनवा आणि कोपर आणि गुडघ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

लिंबाचा रस आणि मध

लिंबाचा रस एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे आणि मध त्वचेला मॉइश्चरायज करण्यास मदत करतं.

कृती

लिंबाचा रस आणि मध समप्रमाणात मिसळून पेस्ट बनवा आणि कोपर आणि गुडघ्यांवर लावा. 10-15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.